मुंबई : जर माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केला तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे सोबत काय केलं? काय कटकारस्थान रचले? मुंडे साहेबांविरोधात काय कटकारस्थान रचले गेले? किती आका आहेत? हे सगळं मी तोंड उघडणार आहे, असा इशारा देत तुम्ही मंत्री आहे, मी काही नाही. मी वाईट महिला आहे, हे मी मान्य करते. अनेक मोठ्या गोष्टी आहेत. मी तोंड उघडलं तर पंकजाताईंचं पण मंत्रिपद जाऊ शकते. धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांचे देखील पद जाईल, असा खळबळजनक गौप्यस्फोट करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना थेट इशारा दिला आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या की, कालच्या निकालासाठी न्यायालयाचे धन्यवाद मानते. आम्ही १५ लाखांची मागणी केली होती, मात्र ते मिळाले नाहीत, त्यामुळे आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहोत. धनंजय मुंडेची सवय आहे की, फुट टाका आणि राज्य करा. स्वतः तोंड उघडत नाही आणि माझ्या मुलाला उभं केलं. माझा मुलगा फ्रस्टेशनमध्ये होता. बरं वाईट आम्हाला झालं तर हा माणूस स्वतःला माफ करु शकणार आहे का? बापाच्या सांगण्यावरुन त्याने स्टोरी टाकली. माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सर्वांनी बघितलं आहे, असा हल्लाबोल त्यांनी धनंजय मुंडेंवर केला.
Maghi Yatra : माघी यात्रेकरिता पंढरपूरात अडीच लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी
करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, ज्या वेळी माझ्या आईचं निधन झालं तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला. माझ्या बहिणीने केस टाकल्यावर माझ्यावर दबाव टाकला आणि सांगितलं की बहिणीची साथ देऊ नको म्हणून, तेव्हा मी बोलली नाही आता माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात तो उभं करत आहे. १९९६ पासून काय-काय केलं हे मी सर्व सांगेल. माझ्या नवऱ्याला त्रास दिला, २७ वर्ष मी पत्नी आहे, तरीही हे सगळं विसरुन कटकारस्थान धनंजय मुंडे माझ्याविरोधात रचतोय. मी एकच बोलते, मला बोलायचं असेल आता तर कॅबिनेटमध्ये येऊन बोलेल. तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची बायको आहे, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.
वाल्मिक कराडनं मला मारहाण केली. दीपा मुधोळ यांच्या कार्यालयात मारहाण झाली, मी तेव्हा सगळ्यांना निवेदन दिलं आहे. माझ्या मुलानं सांगितलं पुरावे द्या, मग मी बघतो वाल्मिक कराडचं काय करायचं? असे त्याने सांगितले आहे. मी निवेदनं दिली, सीसीटीव्हीसंदर्भात विचारणा केली. वाल्मिक कराडनं मला त्रास दिला आहे. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगते की महिलांबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी धनंजय मुंडे यांना पक्षातून हाकललं पाहिजे.
पक्षाचा सहारा घेत ही मोठं झालेली आहेत. मी महिला आयोगात वेळोवेळी गेली, मात्र ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. आजपर्यंत महिला आयोगानं काहीच केलं नाही. मी रेखाताईंना दिल्लीत जात निवेदन दिलं होतं की रुपाली चाकणकर यांना पदावरून हाकला, असे म्हणत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.