संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा
रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा असून ते या दौ-यात भाजपा पदाधिका-यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत.
नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.
अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?
त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
पक्ष बळकटीसाठी भाजपाने जिथे भाजपाचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपाच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी दिली असून त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.