
चंदीगड : बॉलिवूड विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत आला आहे. सोनू सूदच्या विरोधात पंजाबच्या लुधियाना कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रमणप्रीत कौरने हा वॉरंट जारी केला आहे.सोनू सूदला एका प्रकरणात कोर्टात साक्ष देण्यासाठी अनेकदा समन्स पाठवण्यात आले. मात्र सोनू एकदाही कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळे आता त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : फेब्रुवारीचा पहिला आठवडा प्रेमवीरांसाठी खास असतो. जानेवारी संपताच प्रेमाचा जणू नवा ऋतूच बहरतो. तरुणाईचा या दिवसांमध्ये विशेष उत्साह दिसून ...
लुधियानाचे वकील राजेश खन्नाने मोहित शुक्ला या व्यक्तीविरोधात १० लाखांची फसवणुकीची केस दाखल केली. शुक्लाने त्यांना गुंतवणुकीचं आमिष दाखवत त्याची फसवणूक केली होती. याचप्रकरणात सोनू सूदलाही साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स मिळूनही तो कोर्टात हजर झाला नाही. आता त्याला थेट अटक करण्याचा कोर्टाचा आदेश आहे. हे वॉरंट मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे.
यामध्ये अभिनेत्याला अटक करणं आणि त्याला कोर्टात घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला होणार आहे. अद्याप अभिनेत्याने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सोनू सूदचा नुकताच 'फतेह' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोनूने स्वत:च या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं.