विकास नियोजन खात्यात याची घेतली जाणार मदत
मुंबई(विशेष प्रतिनिधी) – आजच्या आधुनिक काळात महापालिकेच्या कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या कारभारात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील पायाभूत सुविधाबांबतचे निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थांत आटीफिशर इंटेलिजन्स – एआय चा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या विकास नियोजन खात्यामार्फत या एआयचा वापर केला कामकाजात केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेने भविष्यातील विकासाचा कल ओळखून संभाव्य शहरी मागणीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांबाबतची निर्णय प्रक्रिया सुधारण्याकरता विकास नियोजन खात्यामार्फत कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एआय वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या सन २०२५-२६ आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.
महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील विकास नियोजनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एकूण किती इमारतींना बांधकामाच्या परवानगी दिल्या आहेत, त्यातील ७० मीटर पेक्षा अधिक बांधकामाच्या इमारती किती आहे, उद्यान, मैदान, मनोरंजन मैदान आरक्षित किती भूखंड आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे अशाप्रकारच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांची माहितीकरता ए आय वापर कामकाज पध्दतीत केला जाणार आहे. या एआयच्या वापर केल्यास एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.