
प्रेमाचे हे सेलीब्रेशन संपूर्ण आठवडाभर सुरू असते. तुम्हालाही तुमचे प्रेम व्यक्त करायचे आहे तर हा आठवडा बेस्ट आहे. तसंच तुम्हाला तुमचे प्रेम मिळाले असले म्हणून तुम्ही याचे सेलीब्रेशन करू नये असेही नाही बरं का...तुमचे प्रेम अधिक वाढवण्यासाठी तुम्ही हा वीक सेलिब्रेट करू शकता.
जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकमधील डेज
७ फेब्रुवारी - रोझ डे
प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब मानले जाते. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमधील पहिला दिवस हा रोझ डे म्हणून साजरा करतात.
८ फेब्रुवारी - प्रपोज डे
व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे असतो. या दिवशी तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
तिसरा दिवस चॉकलेट देऊन साजरा केला जातो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी तुम्ही चॉकलेट देऊन खुश करू शकता.
१० फेब्रुवारी - टेडी डे
सॉफ्ट टॉईज खासकरून टेडी बेअर महिलांना पसंत असतात. तुम्ही आवडत्या व्यक्तीला टेडी डे देऊ शकता.
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे
कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी एकमेकांना वचन देणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात.
१२ फेब्रुवारी - हग डे
प्रेम व्यक्त करण्याची प्रेमळ पद्धत म्हणजे त्या व्यक्तीला अलिंगन देणे म्हणजे हग देणे. म्हणून हा दिवस साजरा करतात.
१३ फेब्रुवारी - किस डे
व्हॅलेंटाईन वीकमधील ७वा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही जोडीादाराच्या कपाळावर अथवा हातावर किस करून आपल्या मनातील भावना सांगू शकता.
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे
सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचता तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. १४ फेब्रुवारीला हा दिवस जोडपे एकमेकांसोबत साजरा करतात.