Sunday, April 20, 2025
HomeदेशPariksha Pe Charcha : यंदा ‘परिक्षा पे चर्चा’ सहभागासाठी ३ कोटी ५६...

Pariksha Pe Charcha : यंदा ‘परिक्षा पे चर्चा’ सहभागासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पंतप्रधान मोदींसह दीपिका पदुकोण, मेरी कोम, विक्रांत मेस्सींसह विविध दिग्गज साधणार संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून संवाद साधतात. गेल्या आठ वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवर महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेमधील यशासाठी तसेच तणावमुक्त राहण्यासाठी एकंदरीतच अभ्यासाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात.

आता पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम यावर्षी नवीन स्वरूपात आणि शैलीत आयोजित केला जात आहे. यावर्षी ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान मोदींसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, बॉक्सर मेरी कोम, अवनी लेखारा, ऋजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता आदी सहभागी होत आहेत. ते विद्यार्थ्यांना टिप्स देतील. २०२५ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

PM Modi : ‘सबका साथ, सबका विकास’ काँग्रेसच्या कल्पनेपलीकडचे; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल

यंदा साडेतीन कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी

२०१८ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. सातव्या आवृत्तीपेक्षा यंदा होणाऱ्या आठव्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी यासाठी २.२६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा कार्यक्रम पहिली तीन वर्षे नवी दिल्ली येथे टाउन-हॉल इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आयोजित केला होता. कोरोना काळात चौथा कार्यक्रम दूरदर्शन आणि सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात ऑनलाइन आयोजित केला होता.

‘परीक्षा पे चर्चा’चे यंदाचे आठवे वर्षे

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे हे आठवे वर्षे आहे. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -