मुंबई : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी (Bank Job) आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेत इंटरनल ओम्बड्समॅन पदासाठी भरती (PNB Recruitment) जारी केली आहे. यासाठी अर्ज प्रकिया सुरु झाली असून २२ फेब्रुवारी अंतिम तारीख असणार आहे. विशेषत: यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे इच्छुकांसाठी ही उत्तम सुवर्णसंधी असणार आहे.
Central Railway : कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
इंटरनल ओम्बड्समॅन पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पीएनबीच्या https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, अर्ज करण्याचा इतर कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या नोकरीसाठी (PNB Recruitment) अर्ज करताना २००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
वयोमर्यादा आणि अनुभव
पंजाब नॅशनल बँकेत नोकरीसाठी ६५ पेक्षा कमी वय असणारे उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तसेच उमेदवाराला बँकेत कामाचा किंवा इतर फायनान्स सेक्टरमध्ये ७ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य असणार आहे. बँकेत जनरल मॅनेजर, फायनान्शियल सेक्टर या विभागात मॅनेजर असणे गरजेचे ठरणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांना ३ वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट कालावधी असणार आहे. यानंतर कामाचा कार्यकाळ वाढू शकतो. या नोकरीसाठी उमेदवाराला दरमहा १.७५ लाख रुपये पगार मिळणार आहे. (PNB Recruitment)