Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : आता गाड्यांची तोडफोड कराल तर तुरुंगातच सडावे लागेल; संबंधितांना मोक्का...

Ajit Pawar : आता गाड्यांची तोडफोड कराल तर तुरुंगातच सडावे लागेल; संबंधितांना मोक्का लावण्याचे अजित पवारांचे आदेश

पुणे : पुण्यात सातत्याने गाड्यांची तोडफोडीच्या घटना ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर कोयते घेऊन दहशत पसरवणारी गँग देखील थांबायचे नाव घेत नाही. यावर आता शेवटचा उपाय म्हणून पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस आयुक्तांना महत्वाचे आदेश दिले आहेत. या तोडफोड गँगला जामीनच मिळणार नाही, असे मोक्काचे कलम लावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

वारंवार तोडफोडीच्या घटना घडत असताना त्यावर कुठलेही नियंत्रण येत नसल्याने अजित पवारांनी थेट पोलीस आयुक्तांवरच प्रश्नांची सरबत्ती केली.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना वांद्रे कोर्टाचा दणका; करुणा मुंडेंना महिन्याला २ लाखांची पोटगी द्यावी लागणार

 

बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी केलेल्या गाड्यांच्या तोडफोडप्रकरणाची पवारांनी दखल घेतली. कोयता गँग, तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांच्यावर मोक्का लावा. आरोपींना पकडल्यानंतर त्यांची अशी धिंड काढा की शहराला कळाले पाहिजे की चुकल्यानंतर कायदा कसा असतो. या कार्यक्रमात पुण्याचे पोलीस आयुक्त हवे होते, त्यांना पण सुनावले असते, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच पुणे पोलीस आयुक्तांना इशारा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -