Saturday, April 19, 2025
Homeदेशदहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करा - अमित शाह

दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करा – अमित शाह

जम्मू-काश्मीर संदर्भात घेतली सुरक्षा आढावा बैठक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील दहशतवादाच्या विरोधातील लढाई तीव्र करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी दोन दिवसांत 2 उच्चस्तरीय बैठका घेतल्या.

गृहमंत्र्यांनी मंगळवार आणि बुधवारी सलग दोन बैठकांमध्ये लष्कर, पोलिस, निमलष्करी दल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसोबत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या सतत आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था कमकुवत झाली आहे.

त्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना घुसखोर आणि दहशतवाद्यांशी अधिक कडकपणे व्यवहार करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना ‘शून्य घुसखोरी’च्या उद्देशाने दहशतवादाविरुद्धची लढाई तीव्र करण्यास सांगितले आहे.

आपले ध्येय दहशतवाद्यांना उखडून टाकणे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. अंमली पदार्थांच्या व्यापाराद्वारे दहशतवाद्यांना होणारे वित्तपुरवठा त्वरित आणि काटेकोरपणे रोखला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी सलग दोन दिवस जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर इतक्या तपशीलवार चर्चा करण्याची ही पहिलीच वेळहोती.

या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, डीजीपी नलिन प्रभात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर उच्च लष्करी, पोलिस आणि नागरी अधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -