Tuesday, July 1, 2025

दहावीच्या बोर्ड परीक्षांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

दहावीच्या बोर्ड परीक्षांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेध आता विद्याथ्यांना लागले असून अभ्यासाची तयारीही सुरू आहे. राज्य शासनाने मंदाची बोर्ड परीक्षा अधिक गांभीयनि घेतली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आत्ता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारन राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.


दहावी आणि बारावीच्या परीक्षाविळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.


दहावी बाराची बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्ला प्रशासनाकडून वीडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.



परीक्षा केंद्राजवळील ५०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद


जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेस रीडिंगद्वारे उपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरारात कलम १४४ लागू करण्यात येईल.

Comments
Add Comment