धनंजय मुंडेंचे १९९८ मध्येच झाले पहिले लग्न, करुणा शर्माच पहिली पत्नी

मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे. करुणा शर्मा ही धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आणि राजश्री ही त्यांची दुसरी पत्नी आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झाले होते, ही बाब सिद्ध झाल्याचे कौटुंबिक न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे वैवाहिक आयुष्य २०१८ पर्यंत सुरळीत होते. पण नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली; असेही कौटुंबिक न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

राजश्री यांच्याशी विवाह केल्यानंतर करुणा यांना धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकराची वागणूक दिली ती अन्यायकारक आहे. करुणा शर्मा पोटगीसाठी पात्र आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख २५ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत. तसेच मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा ७५ हजार रुपये द्यावे, असा आदेश वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला. अर्जदार करुणा शर्मा यांनी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी द्यावी, असाही आदेश कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिला आहे. न्यायालयीन कारवाईसाठी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना २५ हजार रुपये द्यावे, असाही आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांनी सहमतीने आंतरजातीय विवाह केला होता. धनंजय मुंडेंनी १८ जुलै २०१७ रोजी एका मालमत्तेच्या मालकी हक्काबाबतच्या कागदपत्रांमध्ये या संदर्भात उल्लेख केला आहे. ही बाब तसेच करुणा शर्मा यांनी सादर केलेले साक्षी - पुरावे यांची दखल घेऊन कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे.



कौटुंबिक न्यायालयाचा निकाल 'एक्स'वर पोस्ट करुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
Comments
Add Comment

Amit Shah : देशातील नागरी सहकारी बँकाचे मुख्यालय मुंबईत; केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्लीहून मुंबईत कार्यालयाचे स्थलांतर होणार https://prahaar.in/2026/08/08/jalgaon-accident-news-four-people-narrowly-escaped-an-accident/ मुंबई : देशातील नागरी सहकारी

Devendra Fadnavis : सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पाच वर्षांतील देणगी आणि दान संकलनाची तसापणी

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या