Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीशेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका

शहापूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व ७/१२ घेऊन आधार सेंटर, सी.एस.सी. सेंटर व तलाठी कार्यालय अशा ठिकाणी धावपळ करून आपले फार्मर आयडी बनविण्यासाठी मागील दहा-पंधरा दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.

मध्य प्रदेशमध्ये वायुदलाचे लढाऊ विमान कोसळले

शेतकरी आयडी बनवतांना कधी सर्वर डाऊन, तर कधी आधार कार्डवरील माहिती परिपूर्ण असताना बहुतांश केंद्रावर शहापूर तालुका गायब झाल्याचे दिसून येत आहे.कधी शेतकरी फोटो दिसत नाहीत. त्यामुळे पुढील ७/१२ किंवा ओटीपी येणे थांबते. दरम्यान ऑपरेटर देखील खूप प्रयत्न करून सुद्धा नोंदी होत नाहीत याबाबतची माहिती शहापूर तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये खर्च करूनही फार्मर आयडीपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तलाठी कर्मचारी ऑनलाईन तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करत आहेत. तो दूर करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील भातसई, शेरे, शेई, अंबर्जे, मासवणे, नडगाव, डोळखांब, बाबघर इ. भागातील शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही. यामुळे ते हैराण आहेत. पीएम किसानचा १९ वा हप्ता २४ फेबुवारी रोजी वितरित होत असून, फार्मर आयडी अभावीशेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -