Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीराज्यात १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर बदल्यांचा धडाका सुरूच आहे. मंगळवारी राज्यातील १३ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिवपदी, तर डॉ. प्रशांत नरनावरे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.

राहुल कर्डिले यांची आता नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. प्रवीण दराडे यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयात म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन पाटील यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती श्वेता सिंघल यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत नरनावरे यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल भंडारी यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी. के. डांगे यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एस. राममूर्ती यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे राहुल कर्डिलेंची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली प्रवीण दराडे मंत्रालयात सहकार खात्याचे प्रधान सचिव उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित राऊत यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंदकुमार साळवे यांची अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल कर्डिले यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती माधवी सरदेशमुख यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित रंजन यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -