Eknath Shinde : उपमुख्यमंत्री 'डेडिकेटेड टू काॅमन मॅन' यांचा वाढदिवस…शहरभर बॅनरबाजी अन् कार्यक्रमांची जंत्री

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरभर मोठे बॅनरबाजी करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर ‘आमचे दैवत’, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू काॅमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शिंदे यांच्या वाढदिवसानिमितातने शहरभर बॅनरबाजी अन् कार्यक्रमांची जंत्री दिसून येत आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावले आहेेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर नाका ते माजिवाडा नाक्यापर्यंतच्या रस्ता आणि उड्डाणपुलावरील विद्युत खांब तसेच घोडबंदर मार्गावरील विद्युत खांब याठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बस थांबे अशा सर्वच ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक झळकताना दिसन येत आहेत. या बॅनरवर ‘आमचे दैवत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे नेहमी भाषणात डीसीएम म्हणजे 'डेडिकेटेड टू काॅमन मॅन' असा उल्लेख करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही फलकांवर त्यांचा असाच उल्लेख केल्याचे चित्र दिसून येत आहे.



वाढदिवसानिमित्ताने शहरभर करण्यात आलेल्या बॅनरबाजी बरोबरच शहरात आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १४ मध्ये आजूबाजूच्या स्लम परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, मा. नगरसेवक दिलीप बारटक्के आयोजित गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक १२० मैदान, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे येथे ‘आरोग्य महायज्ञ २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. अशाचप्रकारे शहराच्या इतर भागातही आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आनंदोत्सव ३ दिवस साजरा केला जाणार असून यात 'अनाथांचा नाथ’ या ध्वनिचित्रफितीचे पुन: प्रकाशन आणि ‘एकनाथ-लोकनाथ’ या ध्वनिचित्रफितीच्या प्रकाशनाने होणार आहे.

Comments
Add Comment

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसणाऱ्या प्रकल्पांची बांधकामे थांबवली

तब्बल १०६ बांधकामांना बजावल्या स्टॉप वर्कची नोटीस मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या