Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Water Cut : कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही

Water Cut : कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही

*एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती*

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरूवार, ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत असे २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >