Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान

Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान

मुंबई: तुम्हीही रिलायन्स जिओ वापरता का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जिओकडे अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. यात विविध किंमतीचे तसेच फीचर्सचे विविध पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त वार्षिक प्लानबद्दल सांगत आहोत. यात तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


ट्रायच्या आदेशानंतर जिओनेही आपले नवे प्लान्स सादर केले आहेत. हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १७४८ रूपये आहे. यात कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो.


जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही व्हॅलिडिटी ११ महिन्यांची आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात एसटिडी आणि लोकल कॉलिंगचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस वापरण्यास मिळतील. जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लान्समध्ये युजर्सला इंटरनेट डेटा मिळणार नाही. वेगळा तुम्हाला डेटा पॅक घ्यावा लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करण्यास मिळतो.

Comments
Add Comment