Saturday, February 8, 2025
Homeदेशभारत - बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे ७९ टक्के काम पूर्ण

भारत – बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे ७९ टक्के काम पूर्ण

नवी दिल्ली : भारत – बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारत – बांगलादेश सीमेची एकूण लांबी ४०९६.७ किलोमीटर आहे. यापैकी ३२३२.२१८ किलोमीटर क्षेत्रावर कुंपण घालण्यात आले आहे. अद्याप ८६४.४८२ किलोमीटर लांबीचे कुंपण घालायचे असून यामध्ये १७४.५१४ किलोमीटर लांबीच्या अव्यवहार्य टप्प्याचा समावेश आहे.

Actor Rahul Solapurkar : शिवाजी महाराजांविषयी बोलणाऱ्या राहुल सोलापूरकरचा यूटर्न; जाहीर माफीनामा

कुंपण घालताना भू संपादन, बॉर्डर गार्ड बांगलादेशने घेतलेल्या हरकती आणि आक्षेप, कामासाठी आवश्यक मर्यादीत हंगाम आणि भूस्खलन/दलदलीच्या जमिनीशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे कुंपण घालण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. पण देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कुंपण आवश्यक आहे. याच कारणामुळे भारत सरकारने भारत – बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले आहे. सीमांचे रक्षण करण्याकरता सीमेलगत कुंपण घालणे हा एक अतिशय महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. कुंपण घालण्यामुळे सीमेवरील गुन्हेगारी कारवाया, तस्करी, गुन्हेगारांचा संचार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या सगळ्याला आळा घालण्यास मदत होणार आहे.

मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताय…तर हे वाचा…

आंतरराष्ट्रीय सीमेबाबतच्या नियमांचे पालन करत कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. भारताच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी कुंपण घातले जात आहे. नियोजनानुसार हे काम केले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. कुंपण घालण्याचे काम सुरू असताना भारताचे सीमा सुरक्षा दल (Border Security Force or BSF) हे बांगलादेशच्या बीजीबीच्या (Border Guard Bangladesh or BGB) संपर्कात आहे. समन्वय राखून काम केले जात आहे; असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -