
कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच आता विशाल गवळीच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घरावर दगडफेक करत दहशतीचे वातावरण पसरवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विशाल गवळीच्या साथीदारांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

मुंबई : सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर हा चर्चेचा विषय झाला आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओमध्ये ...
कल्याण पूर्वेत २३ डिसेंबर २०२४ रोजी १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणाने कल्याण- डोंबिवली शहर हादरून गेलं होत. या प्रकरणी विशाल गवळीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. चौकशी झाल्यानंतर विशाल गवळीने त्याच्या पत्नीच्या मदतीने हा खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशालचा भूतकाळ गुन्हेगारी प्रवृत्तीतला आढळला.
विशाल जरी तुरुंगात असला तरी त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घराबाहेर अपरात्री राडा केला. आमच्या माणसांना जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो आणि दाखवतो. अशा धमक्या देऊन दगडफेक करत घरासमोरील सामान इतस्ततः फेकून देत पातेले उचलून एका रहिवाशाच्या अंगावर फेकून शिवीगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी या विशाल गवळीच्या साथीदारांना खाकी हिसका दाखवत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विशाल आणि साक्षी गवळी यांना शिक्षा कधी होणार आणि पीडित मुलीला न्याय मिळणार का याकडे कल्याण वासियांचे लक्ष लागले आहे.