Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीज्येष्ठांनी गाजवला काला घोडा आर्ट्स फेस्टिवल

ज्येष्ठांनी गाजवला काला घोडा आर्ट्स फेस्टिवल

मुंबई : प्रतिष्ठेच्या काला घोडा आर्ट्स फेस्टिवलच्या (केजीएएफ) २५व्या पर्वामध्ये इतिहास घडला. या महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी पर्वात प्रथमच जेनएस लाइफने आयोजित केलेला ज्येष्ठ नागरिकांचा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर आणि त्यांच्या टीममधील अभिषेक बोहरा यांच्या दक्ष मार्गदर्शनाखाली ४० ज्येष्ठ नर्तकांनी रंगमंच उत्साहपूर्ण केला. मुंबई हार्मोनिक्स या ज्येष्ठांच्या समूहाच्या अफलातून सादरीकरणाचा आनंद घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. या समुहाचे सदस्य सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन बाजा (माउथ ऑर्गन) वाजवतात.

बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान

याच सोहळ्यात कहानी अभी बाकी है हे प्रख्यात गायिका उषा उथुप यांनी गायलेले जेनएस गीत अधिकृतरित्या सर्वांपुढे आणले गेले. साठीनंतरच्या आयुष्यातील अमर्याद संभाव्यतेला या गीताद्वारे वंदन करण्यात आले. ६० वर्षांहून अधिक वयोगटासाठी एक सुरक्षित ऑनलाइन व ऑफलाइन कम्युनिटी असलेल्या जेनएस लाइफ अॅपमागील तत्त्वाचे प्रतिबिंब या गीतात आहे. या सादरीकरणाने श्रोत्यांची दाद मिळवली आणि वाढत्या वयाबाबतच्या धारणेत बदल घडवून आणणे तसेच ६० वर्षानंतरचे आयुष्य नवीन छंद आणि हेतूसह साजरे करणे यांप्रती जेनएस लाइफची बांधिलकी यातून दृढ होते.

मुंबईतील आरोग्य सुविधांविषयी काय म्हणाले महापालिका आयुक्त ?

जेनएस लाइफच्या संस्थापक मीनाक्षी मेनन यांनी या सोहळ्याच्या व्यापक दृष्टीवर भर दिला. त्या म्हणाल्या, “ही तर केवळ सुरुवात आहे. समृद्ध व समाधानाचे आयुष्य जगण्याची क्षमता ज्येष्ठ नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट जेनएस लाइफपुढे आहे. कहानी अभी बाकी है हे केवळ गीत नाही, ही एक चळवळ आहे, साठीनंतरचे आयुष्यही संभाव्यतांनी भरगच्च असल्याची ही घोषणा आहे. आज श्रोत्यांनी दिलेला प्रतिसाद अफलातून होता आणि यापुढे काय होणार हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

सीनियर शोकेसमध्ये संदीप सोपारकर यांनी नृत्यदिग्दर्शित केलेले एक चैतन्यपूर्ण सादरीकरण झाले. सोपारकर यांच्या चळवळीवरील व समावेशकतेवरील प्रेमामुळे रंगमंच उत्साहाने सळसळत होता. संदीप सोपारकर या उपक्रमाचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणाले, “वय हा केवळ एक आकडा असतो याचा आणखी एक पुरावा म्हणजे आजचे सादरीकरण. या ज्येष्ठांनी रंगमंचावर जी ऊर्जा, दिमाख आणि उत्साह दाखवला तो खरोखर प्रेरणादायी होता. ६० वर्षांवरील समुदायासाठी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने जेनएस लाइफ लक्षणीय काम करत आहे, या प्रवासाचा भाग होण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानास्पद आहे.”

उद्धव गटाचे विमान उडेना, ‘इंडिगो’च्या कर्मचाऱ्यांनी दिला धक्का

केजीएएफच्या डान्स क्युरेटर डॉ. अनोन्ना गुहा या सोहळ्याच्या चाकोरीबाह्य प्रभावाबद्दल म्हणाल्या, “काला घोडा आर्ट्स फेस्टिवलच्या २५ वर्षांमध्ये आम्ही असामान्य सादरीकरणे बघितली आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांचे हे सादरीकरण खरोखर विशेष होते. या सादरीकरणाने अनेक अडथळे पार केले आणि वाढते वय व कलात्मक अभिव्यक्ती यांना एक ताजा दृष्टिकोन दिला. या ऐतिहासिक क्षणाचा भाग असणे आमच्यासाठी खूपच आनंदाचे आहे.”

या सोहळ्याची रंगत वाढवत, मुंबई हार्मोनिक्स या हार्मोनिका वाजवणाऱ्या ज्येष्ठ संगीतज्ञांच्या समूहाने श्रोत्यांना अप्रतिम सुरांच्या माध्यमातून खिळवून ठेवले आणि संगीताला वय नसते हे सिद्ध केले. मुंबई हार्मोनिकातील दिलीप डिसूझा म्हणाले, “ही संधी दिल्याबद्दल मी जेनएस लाइफ आणि काला घोडा यांचा खूप ऋणी आहे. आम्ही मुंबई हार्मोनिक्सचे सदस्य नियमितपणे भेटतो आणि एकमेकांसाठी वाजवतो पण वेगळ्या श्रोत्यांसाठी वाजवण्याचा आणि आम्ही जे वाजवत होतो, त्याला दाद मिळवण्याचा अनुभव छान होता. हा आनंदाचा प्रसंग होता आणि आम्ही त्याचसाठी वाजवतो, आमचे संगीत लोकांना आनंद देते हा विचार आम्हाला छान वाटतो आणि आम्ही तेच करतो. आम्ही व्यावसायिक संगीतकार नाही आहोत पण आम्ही जे करतो त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो, आम्ही वाजवतो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य आम्हाला खूप आवडते.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -