Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Anganwadi Bharti : १२वी पास अन् सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Anganwadi Bharti : १२वी पास अन् सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात कामासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.



शिक्षण आणि वयोमर्यादा


महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.


या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून १८ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषद/नगर पंचायत / नगर पालिका / नगर पंचायत / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment