Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा

बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यात एकूण २८ दिवसांमध्ये १४ दिवस सुट्टया असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील. फेब्रुवारी महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात स्थानिक नियम, सणउत्सवानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो.

३ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. ११ फेब्रुवारीला थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील. १२ फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. १५ फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई नगाई-नोच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवानी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूर मधील बँका बंद असतील.

२० फेब्रुवारी रोजी गुरुवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथेो बैंका बंद असतील. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैद्राबाद (आंध प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी असतील. २८ फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >