
नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका संपली. आता ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसणार आहेत. त्यानंतर मात्र भारताचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील म्हणजेच भारतीय खेळाडूआयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसतील. या टी-२० लीगचा नवीन हंगाम २१ मार्चपासून सुरू होईल. या हंगामाआधी चाहत्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व कोण करेल? आरसीबीच्या कर्णधाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा आरसीबीची (RCB) जबाबदारी घेऊ शकतो अशा बातम्या अनेक चालवल्या गेल्या आहेत. त्या बातम्यांना पुन्हा एकदा वेग येत आहे. या प्रकरणावर संघाकडून एक महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे.

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे ५० हजारांपेक्षा ...
चाहत्यांचा असा विश्वास आहे की, कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करू शकतो. पण याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. फाफ डु प्लेसिसला करारमुक्त केल्यानंतर संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. यादरम्यान, आरसीबीच्या कर्णधारपदाच्या प्रश्नावर आरसीबीचे सीओओ राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले की, सध्या आम्ही काहीही निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात अनेक लीडर आहेत. कर्णधारपद सांभाळू शकतील असे ४-५ खेळाडू आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही विचार करू आणि निर्णय घेऊ.