महावितरणाच्या मदतीने राबवणार उपक्रम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मुफ्त बिजली योजना पंतप्रधान महोदयांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जगातील सर्वात मोठ्या घरांच्या छतावर सोलर उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांकरिता हा उपक्रम महावितरणाच्या मदतीने राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे अक्षयऊर्जा अधिक स्वस्तात व सुलभरित्या उपलब्ध होईल,असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.
पर्यावरण खात्याकरिता सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजा १११३.१८ कोटी एवढी एकूण तरतूद करण्यात आली. हवेच्या गुणवत्तेची समस्या सक्रियतेने हाताळताना या गुणवत्ता सुधारण्यासोबतच स्वच्छ ऊर्जा, स्थितीनुकूलता निर्माण करणे, शाश्वत व्यवस्थापन, शहरी हरितक्षेत्र व जैवविविधता, शहरी पूर तसेच हरित जंगले आणि संरक्षण यावरही मुंबई महानगरपालिका लक्ष केंद्रीत करीत आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण, ज्ञान व माहिती आणि पर्यावरण व हवामान बदल या तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे त्यांनी विशद केले.
महापालिकेच्यावतीने धुळ आणि धूर प्रतिबंधासाठी जारी केलेल्या २८ मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करण्याकरिता विभाग स्तरावर अभियंता, क्लिनअप मार्शल आणि पोलिस यांचा समावेश असलेली ९५ पथके तयार करण्यात आली आहेत. रस्ते धुण्याच्या कामाकरिता ५,००० लीटर क्षमतेने ६७ टेंकर्स आणि ९,००० लीटर क्षमतेचे ३९ टैंकर्स विभाग स्तरावर दररोज वापरात आहेत. वायू प्रदूषण टाळण्यासाठी विभाग स्तरावर दोन पाळ्यांमध्ये मिस्टिंग मशीन्स तैनात करण्यात आल्या आहेत.
रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी दररोज सरासरी २५० किमी रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने सफाई केली जात आहे. शहरातील वायू गुणवत्तेच्या स्थितीवर सतत देखरेख ठेवण्याकरिता ५ नवीन अविरत वातावरणीय वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे आणि ४ मोबाईल व्हॅन्सची खरेदी करण्यात येणार आहे.
वातावरणात रस्त्यावरील धुळीमुळे होणारे वायू प्रदूषण शमनासाठी १०० बॅटरी आधारित सक्शन मशीन (प्रती विभाग ४) खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, लाकूड किंवा कोळसा आधारित पावभट्ट्यांमध्ये (बेकरी) विद्युत व पी.एन.जी. यासारख्या स्वच्छ इंधन वापराकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे समन्वय साधला जात आहे.
वायू प्रदुषणाचे स्त्रोत ओळखून उत्सर्जन सूबी तयार
मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई महानगर क्षेत्रातील वायू प्रदुषणाचे स्त्रोत ओळखून उत्सर्जन सूबी तयार करणेचे काम करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वायू गुणवत्ता अंदाजाची मगत प्रणाली विकसित करण्याचे कामही प्रस्ताविले आहे. या प्रणाली धूलिकणांद्वारे होणाऱ्या प्रदूषणामधील स्थानिक, प्रादेशिक आणि दूरच्या स्त्रोतांच्या उत्सर्जनाचे परिणाम ठरवून ७२ तास आधी वायू गणुवत्तेचा अंदाज देईल आणि संभाव्य उत्सर्जन कमी करण्याकरिता उपाययोजना प्रदान करेल. जेणेकरुन, मुंबई महानगरपालिका वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाच्या उपाययोजना राबवू शकेल.
लो कॉस्ट सेन्सर
आयआयटी कानपूर यांच्याकडून वायू प्रदुषणाच्या स्थानिक स्त्रोतांबर ठेवण्याकरिता लो कॉस्ट सेन्सर बसविण्याचा मुंबई एअर नेटवर्क एडवान्स (मानस)” हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने छाननी करण्यात येत आहे.
नेट झिरो संकल्पनेअंतर्गत इमारत केंद्र शासनाच्या धोरणानुसार एच/पूर्व विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम नगर अभियंता खात्यामार्फत नेट झिरो या संकल्पनेवर करण्याचे योजिले आहे. या संकल्पनेनुसार, सदर इमारतीस लागणाऱ्या विद्युत उर्जेच्या तुलनेत अधिक सौर उर्जा निर्माण करण्याचे नियोजन आहे. तसेच, नेट झिरो वॉटरआणि नेट झिरो वॉटर या संकल्पना राबविण्यात येणार आहेत.
स्वच्छ शहर आणि स्वच्छ हवाः
स्वच्छ भारत अभिवान २.० या अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये कबऱ्याचे घरगुती स्तरावर विलगीकरण, जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया, आकांक्षी शौचालये, १००% सांडपाणी संकलन / व्यवस्थापन / प्रक्रिया / विल्हेवाट, इत्यादीचा प्रामुख्याने समावेश आहे. या अभियानांतर्गत, राज्य शासनाकडून मुंबई शहर स्वच्छता कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून यामध्ये मुंबईत १५,००० सामुदायिक शौचकुपे, चल (floating) लोकसंख्येसाठी ४०० आकांक्षी शौचालये, ४,६७२ घरगुती शौचालये आणि ५०० प्रसाधनगृहांचा समावेश आहे.
कचरा मुक्त तास स्वच्छ मुंबईसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा दिनांक १५.०१.२०२५ पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवा शुक्रवार, सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत ‘कचरा मुक्तताम राबविली जात आहे.
पर्यावरणपूरक स्मशानभूमी – वायू प्रदूषण कमी करण्याकरिता, सन २०२६० मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ५ स्मशानभूमीचे पीएनजी स्मशानभूमीत रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या ९ स्मशानभूमींमध्ये पारंपारिक वि पर्यावरणपूरक शवदाहिनी सुरु करण्यात येणार आहे. वायू प्रदूषणावर मिळवण्याकरिता लाकडाऐवजी पीएनजी अथवा शेणाच्या पर्यावरणपूरक वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल.