Monday, October 20, 2025
Happy Diwali

कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस

कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस
मुंबई: १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य राशीमध्ये परिवर्तन करत आहे. सूर्य संपूर्ण एका वर्षानंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत गोचर करत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते सूर्याचे हा राशी परिवर्तन तीन राशींच्या व्यक्तींसाठी अधिक लाभदायक असू शकते.

जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

मेष - धन वृद्धीचे योग बनत आहेत. तुमच्या इनकममध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील. गुंतवणुकीच्या योजनांमधून खूप लाभ मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. विचार केलेल्या योजना सफल होतील. नवी कामे सुरू करण्यास उत्तम वेळ आहे. वृषभ - नोकरीपेशा लोकांचे प्रमोशन होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित समस्यांतून सुटका होईल. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आई-वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल.
वृश्चिक - नवे घर अथवा नवे वाहन यासारख्या भौतिक सुखाची प्राप्ती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. डोक्यावर कर्जाचा भार कमी होईल. खर्चांमध्ये कमतरता आल्याने बँक बॅलन्स वाढेल.
Comments
Add Comment