Thursday, May 22, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघाला मोठा झटका

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघाला मोठा झटका

मुंबई: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने(Team India) आपल्याच घरात इंग्लंडला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ असे हरवले. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध भारत ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फिटनेसच्या कारणामुळे संघातून बाहेर केले आहे. त्याच्या जागी स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला याच महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळायचे आहे.



अशातच भारतीय संघासाठी हा मोठा झटका असू शकतो. बुमराहला जर आपला फिटनेस सिद्ध करता न आल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. वरूणला सरावासाठी संघात सामील करण्यात आले होते. तसेच रिपोर्ट्समध्येही सांगितले जात आहे की त्याला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघात सामील केले जाईल.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामील करण्यात आलेले नाही. दरम्यान, बूम बूम बुमराह या स्पर्धेत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुमराहला या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान पाठीच्या मांसपेशी ताणल्याने दुखापत झाली होती. बुमराह स्कॅनसाठी बंगळुरू स्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला आहे.

Comments
Add Comment