Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीFetus in Fetu : एक दुर्मिळ वैद्यकीय चमत्कार! बाळाच्या पोटातून दोन अविकसित...

Fetus in Fetu : एक दुर्मिळ वैद्यकीय चमत्कार! बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष काढले!

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एका महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ (Fetus in Fetu) असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. दरम्यान, या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज (४ जानेवारी) या बाळावर अमरावतीच्या ५ डॉक्टर आणि १२ जणांच्या चमूने यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, या बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारची ही जगभरातील केवळ ३४वी घटना असू शकते, अशी शक्यता डॉ. उषा गजभिये यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

या यशस्वी शास्त्रक्रियेबद्दल बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तर वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने ही समाधान व्यक्त केलं आहे.

मे पूर्वी कामे पूर्ण होणार असतील त्याच रस्त्याचे खोदकाम करा

या दुर्मिळ परिस्थितीला वैद्यकीय भाषेत “फिटस इन फेटू” (Fetus in Fetu) असे म्हटले जाते. साधारणतः पाच लाख सामान्य गर्भवती महिलांत अशा प्रकारची एखादी घटना बघायला मिळते, असेही डॉक्टर म्हणाले.

फिटस इन फेटू म्हणजे काय?

बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत २०० तर देशात मोजक्याच अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे.

बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात एक ३२ वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला ३२ आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुर्नतपासणी करून निश्चित केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -