Kerla Story : अंगणवाडीत उपमा नको बिर्याणी किंवा चिकन फ्राय पाहिजे, चिमुकल्याची निरागस मागणी

केरळ : अंगणवाडीत पोषण आहार देण्याचा उद्देश बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करणे हा आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहार देण्यासोबतच, आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य संदर्भ सेवा, पोषण आरोग्य विषयक शिक्षण या सेवाही दिल्या जातात.


मुलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ मुलांसाठी नियोजित केले जातात. अशातच केरळातील एका चिमुकल्याने मला उपमा नको मला बिर्याणी किंवा चिकन फ्राय द्या असं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंगणवाडी आहारात बदल करण्याचा निर्णय केरळ या राज्याने घेतला आहे.




?feature=share


व्हिडीओमध्ये काय म्हणाला चिमुकला ?


व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मुलाच नाव थरजूल शंकर आहे. तो त्याच्या आईकडे बिर्याणीसाठी हट्ट करत आहे. त्याचबरोबर तो म्हणाला,"मला अंगणवाडीतला उपमा नको मला बिर्याणी आणि फ्राय चिकन हवं आहे." या निरागस मागणीची दखल केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली आहे.


वीणा जॉर्ज म्हणाल्या सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून मुलांना अंडी आणि दूध देण्यात येते. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटलं आहे. चिमुकल्याची ही मागणी भविष्यात पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला