Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीCrime News : माता न तू वैरिणी! अंड्यामध्ये उंदराचे विष मिसळून मुलीला...

Crime News : माता न तू वैरिणी! अंड्यामध्ये उंदराचे विष मिसळून मुलीला दिले, अन्…

चैन्नई : पोटच्या मुला-मुलीचे प्रेमसंबंध अनेकांच्या आई वडिलांना आवडत नसते. मात्र असेच प्रकरण तामिळनाडूमधील कल्लाकुरिची शहरातील एका कुटुंबातील जन्मदात्रीकडून तिच्या मुलीबाबात जीवाशी उठले आहे. एक तरुणी एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचे मुलीच्या आईला समजताच आईने तिला अंड्यांमध्ये उंदराचे विष मिसळून खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Ritesh Genelia Marriage Anniversary : रितेश जेनेलियाच्या लग्नाची भन्नाट गोष्ट ऐकली का?

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यातील उत्तर पोनपरप्पी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. एक तरुणी सोशल मीडियावर एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. आई तिला मुलापासून दूर राहून त्याच्याशी नाते संपवण्यास सांगत होती. मात्र मुलीने आईचे म्हणणे न ऐकल्यामुळे मुलीच्या आईने तिला अंड्यांमध्ये मिसळलेले उंदराचे विष दिले.

दरम्यान, विष मिसळलेले अंडी खाताच काही वेळात मुलगी बेशुद्ध पडली. मुलगी जमिनीवर पडलेली पाहून कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यानंतर तपासादरम्यान मुलीला जेवणात काही विषारी पदार्थ टाकण्यात आल्याचे समोर आले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी आईला अटक केली असून चौकशी सुरू केली आहे. तसेच सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -