मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इस्तिमा जमात या कार्यक्रमात मार्गदर्शकांकडून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे करण्यात आली असून या कार्यक्रमानंतर हिंदू तरुणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तरी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबईतील विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी होणार खुली
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान इस्तीमा जमात या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे संबंधित नेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर हिंदू तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाल्याचे प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.