‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ असे आपण म्हणतो. ‘जसा देश तसा वेश’ या उक्तीप्रमाणे आपल्या भारतासारख्या देशांमध्ये सुती कपडे पूर्वीच्या काळी वापरले जात असत. सुती कपड्यांमुळे उष्णता शोषून घेतली जाते. शरीराला चिकटत नाहीत, उष्णता निर्माण करत नाहीत त्यामुळे आपल्या देशात सुती कपड्यांचा वापर खूप होत होता; परंतु मधल्या काळात पॉलिस्टर, सिंथेटिक कपडे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले याचे कारण ते स्वस्त आणि मस्त असते. पुण्यात किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरी करत असलेल्या प्रदीप मराठे यांनाही फक्त सुती कपडेच लागत असत आणि पुण्यात कुठल्याही दुकानात गेलं तर कॉटनचे आहेत असे सांगून कोणताही मिक्स धाग्याचा शर्ट त्यांना दिला जात असे. प्रदीप मराठे यांनी थोडा अभ्यास केला की, आपल्यासारखे हजार एक लोक जरी पुण्यात फक्त कॉटनचे कपडे वापरणारे असले तरीही आपला व्यवसाय चालू शकेल आणि म्हणूनच त्यांनी पुण्यात सर्वप्रथम १९९६ साली एक रिटेल दुकान सुरू केले. या दुकानात ते फक्त कॉटनचे कपडे विकत असे. हे कपडे दुसऱ्या ब्रँडचे असत. अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः उत्पादन घ्यायला सुरुवात केली. पहिल्या दहा वर्षांत १० दुकानांतून व्यवसाय वाढला. नंतर मात्र त्यांनी भरारी घेतली आणि पुढच्या १० वर्षांत त्यांची देशभर १०० आऊटलेट झाली आणि त्यानंतरच्या आठ वर्षांत हा आकडा ३५० वर गेला आहे.
दहा वर्षे केवळ दहा दुकानं का? असे विचारले असता कौशिक मराठे यांनी धंद्याचे गमक सांगितले की, सुरुवातीला कोणताही उद्योग हा थोड्या धिम्या गतीने गेला तरी निराश व्हायचे कारण नसते, कारण त्या काळात आपण अनेक गोष्टी शिकतो आणि जसा एखादा धावपटू सुरुवातीला हळू वेग घेत नंतर भरधाव वेगाने जातो त्याप्रमाणेच अनुभव सिद्ध झाल्यावर धंदा सुद्धा मोठी झेप घेत असतो. त्यामुळे ज्या तरुणांना उद्योजक व्हायचे असेल त्यांनी पेशंस ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रदीप मराठे यांचे सुपुत्र कौशिक आणि कुणाल मराठे यांनी सुद्धा याच उद्योगात यायचे असे ठरवले. कौशिक मराठे यांनी टेक्स्टाईल्स इंजिनीयरिंग तसेच एमबीए तर कुणाल मराठे यांनी इंजिनीयरिंग व मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि वडिलांच्या व्यवसायात उतरून त्यात नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग स्किल्स राबवून त्याचा विस्तार करण्याचे ठरवले. कॉटनकिंग या नावाने आपण या सुती कपड्यांच्या कंपनीला ओळखत असलो तरी कंपनीचं खरे नाव फॅशन किंग लिमिटेड असे आहे. त्यांनी हळूहळू कॉटनकिंग, लीनन किंग आणि TYZER नावाचे तीन ब्रँड बाजारात आणले. कॉटनचे वैशिष्ट्य आणि फायदे नेमके काय आहेत ज्यामुळे तुम्ही फक्त सुती कपडे बनवता? असे विचारले असता कौशिक मराठे यांनी सांगितले की, सुती कपडे पर्यावरणपूरक आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. त्याशिवाय त्यांच्या बारामती इथल्या फॅक्टरीमध्ये सौर ऊर्जा आणि १००% पाण्याच्या पुनर्वापरासह पूर्ण ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया राबवली जाते.
शरीरासाठीही सुरक्षित तसेच उष्णतेपासून संरक्षण करणारे घाम शोषून घेणारे व पुनर्वापर करता येणारे असतात. कॉटनकिंगचा लोगो व नावही विचार करून बनवला आहे. हिरव्या रंगात लिहिलेल्या नावामुळे पर्यावरण पूरकता दिसून येते. कॉटनकिंगचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते फ्रँचाईजी बेस आउटलेट चालवतात.ज्यांच्याकडे जागा आहे, ते स्वतः जागा आणि कर्मचारी ठेवतात. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना कॉटनकिंगतर्फे जागा पुरवली जाते. अशा कोको आणि फोफो अशा दोन पद्धतीने कॉटनकिंगची आउटलेट चालतात. या दुकानांमध्ये केवळ कॉटनकिंगचेच कपडे मिळतात. कॉटनकिंगच्या उत्पादनांचा दर्जा, गुणवत्ता कायम उच्च राखला असल्यामुळे ग्राहक कॉटन किंगच्या नावामुळे येतात आणि त्यामुळेच त्यांचे फ्रेंचाईजीचे जाळे पसरू शकल आहे असे म्हणता येईल. आज कॉटनकिंगमध्ये ८०० कामगार काम करत असून त्यातील ८०% महिला कामगार आहेत, त्यामुळे महिला सक्षमीकरणाचं काम कॉटन किंगमार्फत होत आहे असे म्हणता येईल. कॉटनकिंग कोणत्याही मल्टिब्रँड दुकानात मिळत नाही पण सध्याचा ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड बघून कॉटनकिंग न् स्वतःच्या वेबसाईटवर ऑनलाइन कपडे विक्री सुरू केली आहे.
प्रदीप मराठे यांचे कुणाल आणि कौशिक मराठे हे दोघेही पुत्र व्यवसायात चांगलेच सेटल झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेऊन, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून मार्केटचा विचार करून सतत नवनवीन उत्पादन घेत आहेत. तुमच्यासारख तरुणांना उद्योगात शिरायचे असेल तर काय सल्ला द्याल? यावर कुणाल मराठे म्हणाले की, मार्केटचा ट्रेंड काय आहे? मार्केटला गरज काय आहे? ते पाहून जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केलात, तर विक्री, मार्केटिंग याचा प्रश्न पडणार नाही. त्यामुळे तरुणांनी या गोष्टींचा विचार करूनच उद्योगात पडावे. कॉटनकिंगची आऊट लेट्स महाराष्ट्राच्या जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये आउटलेट झाली आहेत. आता दक्षिण भारतामध्ये पुढच्या दोन वर्षांत अनेक आउटलेट उभारण्याचा मराठे यांची पुढची योजना आहे. आपले भारतीय वस्त्र म्हणजे सुती वस्त्र, त्याची निर्मिती करून त्यात आकर्षक वेगवेगळे प्रकार आणणारे कॉटनकिंग देशभरात विस्तारून लोकांना अस्सल सुती कपडे देणार आहे आणि त्यामुळे आपल्या देशाच्या हवामानाला सूट होईल, असे देशाच पारंपरिक वस्त्र भारतभरातील लोकांना मिळू शकणार आहे.
joshishibani@yahoo. com
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…