Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीUPSC Exam : पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी सतर्क! अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

UPSC Exam : पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी सतर्क! अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षा देण्याची संधी मिळाण्यासाठी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्याचेही दाखवले होते. या सर्व प्रकारामुळे यूपीएससी आता अलर्ट मोडवर आले आहे. यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ साठी ११ फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून अर्ज प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत.

Maandeshi Mahotsav 2025 : ५ फेब्रुवारी पासून परळ मध्ये रंगणार ‘माणदेशी महोत्सव २०२५’

यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ बाबत साठी लोकसेवा आयोगाने अधिसूचना जारी करुन अर्ज मागवले आहेत. या अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रियेत गेल्यावर्षीच्या तुलनेत काही बदल आयोगाने केले आहेत. या बदलांचे कारण, परिक्षा पद्धती आणि अर्ज प्रक्रियेत बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने केलेला गैरप्रकार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत आहे.

अर्ज प्रक्रियेत कोणते बदल ?

  • या अगोदर तपशीलवार अर्ज भाग१ आणि भाग १ (डॅफ १ आणि डॅफ-२) पूर्व परिक्षेनंतर भरावे लागायचे. मात्र, आता पूर्व परिक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना डॅफ-१ आणि डॅफ-१ मधील तपशील भरावा लागत आहे.
  • विद्यार्थ्यांनी आता पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत जन्मतारीख पुरावा, आरक्षण प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ आरक्षण प्रमाणपत्र इत्यांदीचा क्रमांक सादर करावा लागायचा.
  • मागील वर्षापर्यंत मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सेवा प्राधान्ये (सर्व्हिस प्रीफ्रन्स) द्यावा लागायचा. मात्र, आता विद्यार्थ्यांनी पूर्व परिक्षेचाच अर्ज भरताना त्यांच्या सेवा प्राधान्ये निवडणे आवश्यक आहे.
  • पूर्व परिक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना २०० रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील (सूट दिलेली श्रेणी वगळता).
  • विद्यार्थ्यांना आता पूर्व परीक्षेच्या निकालाच्या १० दिवसांच्या आत त्यांचे कॅडर प्राधान्ये सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी, डॅफ २ मध्ये मुख्य परीक्षेच्या निकालानंतर केंडर पसंती सादर करावी लागत असे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -