Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनमल्टिप्लेक्सताज्या घडामोडी

मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये

मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील घर विकून साडेआठ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षीने गुंतवणूक म्हणून वांद्रे पश्चिमेला एमजे शाह समुहाच्या एका संकुलात चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया ४६३२ चौरसफूट होता तर कार्पेट एरिया ४२११ चौरसफूट होता.



सोनाक्षी सिन्हाने '८१ - ऑरिएट' (81 Aureate, Bandra West, Mumbai) या ४.४८ एकर परिसरात पसरलेल्या संकुलात एक चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट सोनाक्षीने मार्च २०२० मध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने १४ कोटी रुपयांत खरेदी केला होता. फ्लॅटसाठी सोनाक्षी सिन्हाने ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी अर्थात नोंदणी शुल्क आणि १.३५ कोटी रुपये स्टँप ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क भरले होते. सोनाक्षीने २०२५ मध्ये तिच्या मालकीचा '८१ - ऑरिएट'मधील १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला. या व्यवहारात सोनाक्षीला साडेआठ कोटी रुपयांचा नफा झाला. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने या व्यवहाराच्या नोंदणीची छाननी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला आणि ६१ टक्के नफा कमावला.



सोनाक्षी प्रमाणेच अनेक श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. फक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कधी करायची आणि विक्री कधी करायची हे समजणे आवश्यक आहे. ज्यांना हे समीकरण समजले त्यांनाच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून नफा कमावणे शक्य आहे.
Comments
Add Comment