
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवा. शेती, पर्यटन, पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यायला हवा. जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.

मुंबई : रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी या नावांनीही ओळखले ...
यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नियोजन अधिकारी बुधावले आदी उपस्थित होते.