Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीरजनीकांतच्या ’कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आत्महत्या

रजनीकांतच्या ’कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आत्महत्या

अमली पदार्थ प्रकरणात केली होती अटक

पणजी : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलगु चित्रपट निर्माता के. पी. चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी याने गोव्यात आत्महत्या केली आहे. के. पी चौधरी याला २०२३ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याने गोव्यात आत्महत्या करत आपले जीवन संपवले.

के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माता असून त्याने मेगास्टार रजनीकांत यांच्या ’कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्याला हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.

टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्याच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात गुंतला. यातील कमाईतून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता.

अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या

यानंतर चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होता व येथेच त्याने क्लब देखील सुरु केला. पण या व्यवसायात देखिल तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होता. या घटनेनंतर चौधरी खचला होता. शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

के. पी. चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -