Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीबहुचर्चित 'स्थळ' चित्रपटाचा मनोरंजक टीझर लाँच

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीझर लाँच

मुंबई : अरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट असलेल्या स्थळ या चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच करण्यात आला आहे. टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर उद्या येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या उत्साही घोषणेमुळे टीझर आणि एकूणच चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by स्थळ (@sthalthefilm)


सर्वसाधारणपणे लग्नासाठी स्थळ पाहायला गेल्यावर मुलगा आणि त्याचे कुटुंबीय मुलीला प्रश्न विचारतात. त्यावेळी बावरलेली मुलगी तिच्या परीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न असते. आपलं काही चुकू नये यासाठी तिची धडपड असते. पण, एखाद्या वेगळ्या परिस्थितीमध्ये मुलीऐवजी मुलाला प्रश्न विचारले गेल्यावर काय होतं हे ‘स्थळ’ या चित्रपटाच्या टीजरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अॅरेंज्ड मॅरेज अर्थ स्थळ पाहून लग्न होणं यावर स्थळ हा चित्रपट बेतला आहे. मात्र तोचतोचपणा टाळून मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटाची हाताळणी करण्यात आल्याचं टीजरवरून जाणवतं.

जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह तब्बल २९ महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे, तसेच १६पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -