Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIND vs ENG: गौतम गंभीरची अग्निपरीक्षा सुरू...भारतीय संघ आता चॅम्पियन्सच्या ट्रॉफीच्या तयारीला

IND vs ENG: गौतम गंभीरची अग्निपरीक्षा सुरू…भारतीय संघ आता चॅम्पियन्सच्या ट्रॉफीच्या तयारीला

मुंबई: भारतीय संघ यावेळेस आपल्याच भूमीत इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. दोन्ही संघादरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने दमदार खेळ करताना ४-१ असा विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने यावेळी नेतृत्व केले होते. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडेची.

यासोबतच भारतीय संघ या महिन्यात आयसीसी चॅम्पियनशिप ट्ऱॉफी २०२५मध्येही खेळणार आहे. टीम इंडियाचे हे खरे मिशन आहे आणि यात हेड कोच गौतम गंभीरसह कर्णधार रोहित शर्माचीही अग्निपरीक्षा असणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वनडे मालिका असणार खास

मात्र त्याआधी भारतीय संघाला आपल्याच घरात इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीनुसार ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅटही वनडे असणार आहे.

भारत वि. इंग्लंड सामन्याची तिकिटे काही मिनिटातच संपली 

अशातच गंभीर आणि रोहित इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्व प्रयोग करतील. सोबतच या मालिकेतून टीम इंडियाची तयारीही दिसून येणार आहे. एकीकडे आपण म्हणू शकतो की इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेद्वारे भारतीय संघाचे मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल.

भारत-इंग्लंड वनडे मालिका

पहिली वनडे ६ फेब्रुवारी – नागपूर
दुसरी वनडे – ९ फेब्रुवारी – कट्टक
तिसरी वनडे – १२ फेब्रुवारी – अहमदाबाद

इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -