Tuesday, July 1, 2025

सीरियामध्ये बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू, १२ हून अधिक जखमी

सीरियामध्ये बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू, १२ हून अधिक जखमी

दमिश्क : उत्तर सीरियामधील मनबिज शहराच्या बाहेरील भागात कारमध्ये भीषण स्फोट झाला. यामध्‍ये १५ जण ठार झाले असून, १२ हून अधिक जण जखमी झाले आहे. बाॅम्‍बस्‍फाेटात मृत्‍युमुखी पडलेल्‍यांमध्‍ये १४ महिलांचा समावेश आहे.स्थानिक नागरी संरक्षण आणि युद्ध देखरेख संस्थांनी याबद्दल माहिती दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनबिज शहराच्या बाहेरील भागात कारचा स्फोट झाला. दरम्यान शेती कामगारांना घेऊन जाणाऱ्या गाडीला या स्फोटाचा तडाखा बसला. यामध्ये १४ महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झालेत. बळी पडलेले लोक शेती कामगार होते.


तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं एका नागरी संरक्षण अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले. अद्याप या दहशतावदी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मागील ३ दिवसातील सीरीयामधील हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.


दरम्यान, शनिवारी (दि.१) मनबिजच्या मध्यभागी झालेल्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता.तसेच मुलांसह नऊ जण जखमी झाले, असे सीरियाची राज्य वृत्तसंस्था सानाने वृत्त दिले आहे.

Comments
Add Comment