मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२०मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना वानखेडेच्या मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, भारतीय संघाने ४ विकेट गमावताना १९० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताने सलामीवीर अभिषेक शर्माने ३७ बॉलमध्ये जबरदस्त शतक ठोकले. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकणारा दुसरा भारतीय बनला आहे. त्याने संजू सॅमसनचा रेकॉर्ड तोडला आहे. त्याने ४० बॉलवर सेंच्युरी ठोकली होती. दरम्यान, भारतीयांमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३५ बॉलवर वेगवान शतक ठोकल्याचा रेकॉर्ड आहे.
वानखेडेच्या मैदानावर अभिषेकने चौकार षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने आपल्या शतकी खेळीदरम्यान १० षटकार ठोकले. म्हणजे तब्बल ६० धावा त्याने फक्त १० बॉलमध्ये काढल्या.