मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी महत्त्वाचा संस्कार हिंदू विवाह. शिक्षण आणि स्वातंत्र्य यामुळे लग्नसंस्कृती डळमळीत झाली. उदा. आपण पाहूया
विवाह मंडळातून कॉल आला. पाहुणे आले, पसंती झाली. पत्रिका जुळली.
प्रश्न फक्त होता तो राहण्याचा. पुणे की मुंबई. लग्न झाल्यानंतरही मुलीला पुणे सोडायचं नव्हतं. आजकाल स्थळांचे वेगवेगळे किस्से रमा आणि अरुणा सांगत होत्या. एक काळ होता पूर्वी लग्नासाठी योगायोगाने स्थळ यायची. मागणी घालायचे. तो काळ वेगळाच. आता सगळंच बदललं आहे.
उल्काला फोन आला. चक्क चोवीस वर्षीय युवती तरुणी फोनवर बोलत होती. मी अनुया बोलते… आई! आई का? पहिल्याच फोन कॉलमध्ये मुलगी विचारते? हो. हो मी आईच! मग आई तुम्ही पुण्यालाच स्थायिक होणार का? आई : अजिबात नाही. मग तू तुझ्या आई-वडिलांना मला फोन करायला सांग. उल्काच्या निम्म्या वयाची ही मुलगी. अत्यंत उतावळेपणा, मते लादणे हा हल्लीच्या मुलींचा अतिरेक.
साक्षीला मुंबईचे स्थळ आले होते. मुंबईत स्थायिक राजेश आणि शुभा यांचा एकुलता एक अनुराग एकमेकांची पसंती झाली. पत्रिका छापल्या, लग्न मुहूर्त जवळ आला. तेव्हा अनुरागच्या कानावर आले. साक्षी एकाच कालावधीत दोन मित्रांना डेट करत आहे. इथे मात्र जमलेलं तोंडावर आलेले लग्न मोडलं. त्याच दुःखाने अनुरागचे कुटुंब आणि अनुराग दुखावला. याला कोण जबाबदार?
मानकर सरकारी नोकरीमधून रिटायर झाले. सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पडल्या. धाकट्या चेतनला चांगल्या घरचे स्थळ आले. इंजिनीयर मुलगी आणि तो डेंटिस्ट. मानकरांच्या प्रॉव्हिडंट फंडमधून मोठा बंगला बांधला. लग्न जुळले, झालेही. ते एकत्रित राहू लागले. पै पै जोडून केलेल्या संसारावर उभारलेलं स्वप्नांचा मनोरा क्षणात ढासळला. आलिशान घर, मोठी गाडी, मुलांना घडवताना खस्ता खाल्लेले जीवन. घडले काय नेमके? आमचे लग्न झालं की आम्ही येथे राहू ! आता तुम्ही गावी निघून जा! उगाच आमच्या करिअरला आणि घरामध्ये अडचण नको. आताच्या मुली सोशिक नाहीत. पूर्वी कसं होतं मोठं कुटुंब. सगळं सहन करायची सहनशक्ती होती. पण आता सासू-सासरे सुद्धा नकोत. स्वार्थी जग अख्खी पुंजी एकत्र करून बांधलेला बंगल्यात हक्क सांगणारी बेजबाबदार मुलगी घरात आणली.
कोणी पाहुणे यायला नकोय. आजकाल नाही पटलं की, तडजोड टेन्शनच नाही. डायरेक्ट टोकाचा निर्णय घटस्फोट! पोटची मुलं मोठी होऊन, शिकून परक्याचं धन म्हणण्यापेक्षा परक्याचा हमाल झालं म्हणायचं. सासू-सासऱ्यांच्या कानावर आले की, सुनबाईला दिवस गेले. तीन महिने घरात तिचे लाड पुरवून घेतले. घरच्यांनी डोक्यावर घेतले. कुठेतरी पिकनिकला गेली आणि मिसकरेज झालं. कायमची मुलं नको म्हणून तिने ते कीरेटिंग केले. तेही पतीला आणि सासूबाईंना न विचारता! एकदाही कुटुंबाला विचारावे असे प्रामाणिक मत नाही. मग मात्र भांडण विकोपाला गेले. सासूच्या ही अपेक्षा असतातच ना! एक तरी, मग काहीही असो. मुलगा किंवा मुलगी. पण असावे. मग तुम्ही तुमचे करिअर करू शकता. पण नाही हल्लीच्या मुलींना करिअर हवे म्हणून विवाह उशिरा. नंतर फिटनेस हवा म्हणून मुलेच नकोत. जबाबदाऱ्या नको असतात. संसार करण्याची तयारी नसते.
विवाह जुळवण्याची बैठक होती. इकडची तिकडची माणसे मिळून झाली वीस-पंचवीस. माणसाने घर भरलेलं. एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झाला. सर्व विषय झाल्यानंतर मुलीच्या आईने विषय काढला. मुलांना लग्नाच्या पहिल्या दिवसापासून स्वतंत्र ठेवलं पाहिजे. अर्जितची आई नको. ती बिचारी विधवा बाई. लग्न जमण्याच्या सभेत त्यांच्याच घरात तिने राहू नये. तुम्ही मुलगी ज्या घरात देताय. आधार नसताना संसार उभा केला, मुलाला शिकवलं, वाढवलं. त्या घरात नवखी मुलगी जाणार आणि आहे त्या बाईला घराच्या बाहेर काढणार? शेवटी फिस्कटलेच लग्न. अर्जितने स्पष्ट नकार दिला. आजकाल मुली चक्क जुनी माणसं ओल्ड फर्निचर म्हणतात.
करिअर आणि फिटनेससाठी मुलांना जन्म देणं टाळतात. मागच्या पिढीतले आपल्याच घरातले ज्येष्ठ नकोत. स्वतंत्र एकटे दोघे देखील एकमेकांना सांभाळताना सुद्धा त्यांच्या भांडणाचे परिणाम टोकावर जातात. मागची पिढी आणि पुढची यात अधांतरी लोमकळते आहे ती मधली पिढी. त्यांचे सँडविच धड आड न विहीर. मधल्यामध्ये शोषिक, समंजस, मेहनती, प्रेमळ सर्वांची मने जपणारे. स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणारे, कळकळ, तळमळ, संवेदना, कष्ट उपसणारे पण त्यांच्यावरच आता अन्याय होत आहे. एक तो काळ त्यांच्या आधीच्या पिढीशी जुळवून प्रयत्नांची पराकाष्टा असे. सोसत जगत आले. तर आता पुढल्या पिढीला समजून घेता घेता उतरत्या वयात प्रॉब्लेम्स. शोषण ! मग ते मानसिक, आर्थिक, शारीरिक सारं आलं.
भरकटते ही आताची पिढी. अशाश्वत नातेसंबंध. विस्कटते घडी अस्ताव्यस्त. अनाठाई, अनागोंदी कारभार. नात्यापेक्षा पैसा, करिअर, स्पर्धा, तुलना, हव्यास, फिटनेसला महत्त्व. वय वाढतंय पण अक्कल-हुशारी नाही. कळपापासून दूर राहायचे आणि एकटे मानसिक हेल्थ आरोग्याचा बट्ट्याबोळ. कधी कळणार? योग्य वयाच्या वेळेवर होणाऱ्या गोष्टी वेळीच घडू देेत हे निसर्गाचे वरदान. आम्ही मागच्या पिढीकडून खूप शिकलो. हे पुढची पिढी पटवून घेत नाही. आताच्या पिढीला मुलेच नकोत आणि आजच्या आजी-आजोबांना नातवंडे पाहिजेत. लग्न संस्थेत योग्य वयात लग्न न झाल्यामुळे घडलेला परिणाम भीषण होत आहेत. संतुष्ट, समाधानी, परिपूर्ण तर कोणीच नसतं. पण सामंजस्य असावे. संवेदनशील विचार करा. तरच लग्न जुळतील, टिकतील. पर्यायाने समाजातील लग्न संस्थेवर होणारे दुष्परिणाम टळतील.