Monday, February 17, 2025
HomeदेशBudget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी ३.० सरकारचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातच काय स्वस्त होणार काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत मोदी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षांत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर केंद्रे बांधली जातील. तसेच पुढील आर्थिक वर्षातच यापैकी २०० केंद्रे बांधली जाणार आहेत.

काय झाले स्वस्त?

एलईडी, एलसीडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट

मोबाइल फोन, मोबाइलचे पार्ट

भारतात बनवण्यात आलेले कपडे

३६ जीवरक्षक औषधे

कॅन्सरसंबंधित औषधे

इलेक्ट्रॉनिक वाहने

चामड्यांच्या वस्तू

वैद्यकीय उपकरणे

लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर

काय महागले?

कपडे

घर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -