
दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा एक अनोखा विक्रम आहे. याआधी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मात्र त्यांनी वेगवेगळ्या कार्यकाळांमध्ये अर्थसंकल्प सादर केले आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएनं विजय मिळवला. त्यावेळी सीतारामन पहिल्यांदा अर्थमंत्री झाल्या. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्या वर्षीसाठी पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सीतारामन सलग अर्थसंकल्प सादर करत आलेल्या आहेत. मोदी ३.० सरकारमधला हा त्यांचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा ...
गेल्यावर्षी १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर केलेला सर्वात कमी कालावधीचा अर्थसंकल्प फक्त ५७ मिनिटे चालला. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७५ मिनिटे अर्थसंकल्पात सादर केला. या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.