परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सूचना
ठाणे : प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. (Pratap Sarnaik)
Mumbai Flower Festival : राणीच्या बागेत फ्लॉवर फेस्टिव्हलला प्रारंभ! तीन दिवस बहरणार पुष्पोत्सव
या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढली आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.
एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (इटीआयएम) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील. अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत,याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
युपीआय पेमेन्टद्वारे उत्पन्न तिकीट (दर वाढण्यापूर्वी)
दिनांक – युपीआयद्वारे उत्पन्न
२१ . ०१ . २५ – ८७५८०६०
२२. ०१ . २५ – ८६५०९०५
२३. ०१. २५ – ८४२३०२५
२४. ०१. २५ – ६७३६०१८
युपीआय पेमेन्टद्वारे उत्पन्न तिकीट (दर वाढल्यानंतर)
दिनांक – युपीआयद्वारे उत्पन्न
२६. ०१. २५ – १५३०५८६४
२७. ०१. २५ – १४६०४२७२
२८. ०१. २५ – १२५१८०८३
२९. ०१. २५ – ११९८२८४१
३०. ०१. २५ – १२५८०८७१