Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीमाहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार - माहिती तंत्रज्ञान...

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार

मुंबई : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी ४०६६ नव्या आधार किटचे वाटप १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी दिली.

नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे अशा विविध सेवा देणारी ई सेंटर राज्यभर सुरू असून यासाठी लागणारी ३,८७३ आधार कार्ड किट सन २०१४ साली जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापैकी सुमारे २,५५८ किट सध्या वापरात असून १,३१५ किट नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २,५६७ नव्या किटची मागणी करण्यात आली होती. याबाबत ग्रामीण भागातून आलेल्या मागण्या लक्षात घेऊन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांनी गुरुवारी मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. नव्याने ४०६६ किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीनंतर घोषित केला.

‘राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज’

या जिल्ह्यांमध्ये होणार नवीन किट उपलब्ध

येत्या १० फेब्रुवारीपासून ही नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या यु.आय.डी.आय. टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नव्याने किट उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगरला ३४, अकोला ७८, अमरावती १०९, छत्रपती संभाजीनगर १३४, बीड ५८, भंडारदरा २३, बुलढाणा १२४, चंद्रपूर ७४, धुळे ११३, गडचिरोली ४४, गोंदिया ४८, हिंगोली ८८, जळगाव १६७, जालना १०४, कोल्हापूर १८८, लातूर २७१, मुंबई शहर १०३, मुंबई उपनगर १२२, नागपूर ९१, नांदेड ११२, नंदुरबार ९०, नाशिक ४९, उस्मानाबाद ७३ आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना १५३, परभणी ५५, पुणे ३३८, रायगड ६३, रत्नागिरी ५९, सांगली १३०, सातारा १३२, सिंधुदुर्ग १६०, सोलापूर १४६, ठाणे ४००, वर्धा ५०, वाशिम १००, यवतमाळ ८३ किट उपलब्ध होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -