Monday, October 27, 2025
Happy Diwali

इंग्लंडविरुद्ध भारताचा १५ धावांनी विजय, मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी

इंग्लंडविरुद्ध भारताचा १५ धावांनी विजय, मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने १५ धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताने इंग्लंडला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडचा डाव १६६ धावांवर आटोपला. इंग्लंडचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून हर्षिित राणा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत इंग्लंडच्या संघाला खिंडार लावले. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी बोलावले. भारताने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर १८२ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले आहे.

सुरूवातीच्या फलंदाजांपैकी सलामीवीर अभिषेक शर्माने २९ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होत असताना शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पहिल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपतो की काय असे वाटत होते. मात्र शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी झटपट अर्धशतक ठोकताना भारताला १८० पार धावसंख्या गाठून दिली.

हार्दिक पांड्याने ३० बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकार ठोकत ५३ धावा केल्या तर शिवम दुबेने ३४ बॉलमध्ये ७ चौकार आणि २ षटकाराच्या जोरावर ५३ धावा केल्या.

इंग्लंडला आता या सामन्यात जिंकायचे असेल तर धावा कराव्या लागल्या. याआधी राजकोटच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून २६ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर त्याआधी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ अशा आघाडीवर आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >