Monday, February 17, 2025
Homeक्रीडाभारत वि इंग्लंड आज चौथा सामना पुण्यात, भारत विजयी आघाडी घेणार का?

भारत वि इंग्लंड आज चौथा सामना पुण्यात, भारत विजयी आघाडी घेणार का?

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्याच पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज म्हणजेच शुक्रवारी खेळवला जात आहे. टीम इंडिया मालिकेत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकातामध्ये खेळवण्यात आला होता. यात भारताने ७ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर चेन्नईमध्ये टी-२०मध्ये भारताने इंग्लंडला २ विकेटनी हरवले होते.

दरम्यान, इंग्लंडने पलटवार करताना राजकोट टी-२०मध्ये भारताला २६ धावांनी हरवले. आता भारतीय संघाचे लक्ष्य पुणे टी-२० सामना जिंकत मालिका आपल्या नावावर करण्याचे असेल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे २ बदल

या सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग ११वर सगळ्यांची नजर असेल. सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. अर्शदीप सिंहचे या सामन्यातून पुनरागमन होऊ शकते. अर्शदीपला राजकोटमधील सामन्यात आराम दिला होता. याशिवाय प्लेईंग ११मध्ये ऑलराऊंडर शिवम दुबेचीही एंट्री होऊ शकते. शिवमला नितीश कुमारच्या जागी स्क्वॉडमध्ये सामील केले होते.

भारत – इंग्लंड सामन्यासाठी पुण्यातील वाहतूक मार्गांमध्ये बदल

अर्शदीपला या सामन्यात रवी बिश्नोईच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. बिश्नोई गेल्या सामन्यात खूपच महागडा ठरला होता. त्याने चार षटकांत ४६ धावा दिल्या होत्या. तर या मालिकेत त्याला केवळ एकच विकेट मिळवता आली आहे. शिवम दुबेला ध्रुव जुरेलच्या जागी संधी मिळू शकते. त्याने दोन सामने खेळत केवळ ६ धावा केल्या.

भारताचा संघ

सूर्यकुमार यादव(कर्णधार), संजू सॅमसन(विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमणदीप सिंह, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -