
नवी दिल्ली : देशाने पुन्हा काँग्रेसचे शाही राजघराणे पाहिले. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत संबोधित केले. ओरिसातील एका गरीब कुटुंबातून त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही, उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले. पण काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांचा अपमान केला. राजघराण्यातील एका सदस्याने (राहुल गांधी) राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले. तर, आणखी एका सदस्याने (सोनिया गांधी) (Sonia Gandhi) पुअर लेडी म्हटले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोनिया गांधींवर हल्लाबोल चढविला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी(३१ जानेवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मूंना ‘पुअर लेडी’ म्हटले. यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली : विकसित भारत हे आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी आज, शुक्रवारी केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय ...
‘एका आदिवासी महिलेचे बोलणे काँग्रेसला कंटाळवाणे वाटते. हा देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान आहे. काँग्रेस प्रत्येकवेळी गरीब, दलित आदिवासींचा अपमान करते. काँग्रेसला परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे आणि शहरी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे आवडते,’ अशी टीका पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ (Economic Survey) सादर केला. भारताला उच्च ...
अनादर करण्याचा हेतू नाही
प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं की, ‘माझी आई ७८ वर्षांची महिला आहे; तिने फक्त असे म्हटले आहे की ‘राष्ट्रपतींनी इतके मोठे भाषण वाचले आणि त्या थकल्या असतील, बिचाऱ्या.’ ती (आई) हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींचा पूर्ण आदर करते. मला वाटते की माध्यमांनी अशा प्रकारच्या गोष्टीचा विपर्यास केला आहे हे खूप दुर्दैवी आहे. त्या दोघीही आदरणीय व्यक्ती आहेत आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. हे स्पष्ट आहे की त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही’.
काँग्रेसने राष्ट्रपतींसह आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या शब्दप्रयोगाचा मी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तीव्र निषेध करतो. अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केल्याने काँग्रेसचा गरीब विरोधी, आदिवासी विरोधी चेहरा दिसून येतो. काँग्रेसने राष्ट्रपती आणि आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘त्या’ टिप्पण्यांमुळे उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का
सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त सभागृहासमोर ४९ मिनिटे अभिभाषण केले. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. बिचाऱ्या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. सोनिया गांधींच्या वक्तव्यावर राष्ट्रपती भवनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
एका निवेदनात, राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी सोनिया गांधी यांच्या विधानावरुन टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यासाठी तासभर चाललेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुठेही थकल्या नव्हत्या, असे राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिप्पण्या दुर्दैवी असून पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत. या वक्तव्यांमुळे राष्ट्रपती कार्यालयाची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे, असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे.