Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीAncient Artifacts Stolen : ड्रेंट्स म्युझिअममधून २५०० वर्षापूर्वीचे शिरस्त्राण चोरीला; तीन संशयित...

Ancient Artifacts Stolen : ड्रेंट्स म्युझिअममधून २५०० वर्षापूर्वीचे शिरस्त्राण चोरीला; तीन संशयित ताब्यात!

अ‍ॅमस्टरडॅम : नेदरलँडमधील ड्रेन्टस् मुझिअममधील (Drents Museum) इतिहासकालिन मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली आहे. (Ancient Artifacts stolen) तब्बल २,५०० वर्षापूर्वीचे हेल्मेटसारखे दिसणारे शिरस्त्राण व ब्रेसलेट यांची किंमत कोट्यवधी रुपयांची असून या दोन वस्तू चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Pune News : माघी गणेश जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत बदल!

नेदरलँडने नॅशनल हिस्ट्री म्युझिअम ऑफ रोमानिया यांच्याकडून कर्ज स्वरुपात प्रदर्शशनासाठी हे ऐवज घेतले होते. बुचरेस्ट शहरातील ड्रेन्ट मुझिअममध्ये प्रदर्शनात या वस्तू ठेवल्या होत्या. मात्र २५ जानेवारी रोजी चोरांनी म्युझिअमचा दरवाजा स्फोटाने उडवून या दोन्ही गोष्टी लंपास केल्या. दरम्यान, सध्या चोरी प्रकरणी नेदरलँडमधील हेअरग्रॉड या शहरातून डच पोसिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेले ऐवज अजूनही हस्तगत करता आले नाही.

या घटनेनंतर ‘म्युझिअमच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे’ अशी प्रतिक्रिया ड्रेन्ट मुझिअमचे संचालक हॅरी ट्युपान यांनी दिली आहे. तसेच १७३ वर्षाच्या मुझिअमच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे असे त्यांनी म्हटले. (Ancient Artifacts stolen)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -