DCM Ajit Pawar : मकोका लावताना जातपात बघणार नाही ;अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना खडसावले

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा ते बीडच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांच्या अनेक बैठका होणार आहेत. आता नुकताच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील हजर होते. मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप प्रत्यारोपांची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी अजित पवार यांनी बीड जिल्हाकडे लक्ष घातले आहे.



कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "चुकीचे काम केल्यावर मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाहीये. जिल्हातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत. जातपात बघू नका. चुकीच्या पद्धतींना आळा घातला पाहिजे. आपलं चरित्र्य स्वच्छ ठेवा. बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. जे मुद्दे माझ्या स्तरावर सोडवता येतील, ते मी सोडवेल. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील विषय ते सोडवतील. अफवांवर विश्वास ठेऊ नका. पीकविम्याबद्दलच्या तक्रारी तपासल्या जातील. रिल्स वगैरे खपवून घेणार नाही. विटी दांडू, पतंग खेळायला आलो नाही, काम करायला आलोय. तथ्य असेल तर कारवाई होणारच. जातीय सलोखा राखला पाहिजे. चांगले वागा मी तुमच्यासोबत आहे, चुकीचे वागाल तर तुमच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. गंभीर घडले तर मकोका पण लावला जाईल. मला काम करायला आवडतं. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलीये, लवकरच आदेश निघेल. तुम्ही मला साथ द्या, मला सहकार्य करा. जे लोक सातत्याने बीडबद्दल जे सांगत आहेत, ते आपल्याला बदलायचे आहे, "


 

माझ्याकडेही सरड्यासारखा रंग बदलणारी जमात आहे, सरडा बदलणारे सगळीकडे असतात, तसं चालणार नाही. असं म्हणत अजित दादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.


दरम्यान, बीडच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.