Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : “एका गाण्यासाठी चित्रपट पणाला…”; छावा चित्रपटातील लेझीम वादावर राज...

Raj Thackeray : “एका गाण्यासाठी चित्रपट पणाला…”; छावा चित्रपटातील लेझीम वादावर राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मुंबई : ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी काही दिवसांआधी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या चिपटासंदर्भात भाष्य केलं आहे.

मुंबईतील वरळीत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे ‘छावा’च्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले. राज ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. तर संभाजी महाराज आमचे बलिदान आहेत. ‘छावा’ चित्रपटाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला असल्याच मला अमेय खोपकर यांनी सांगितले. त्यासंदर्भात तुम्हला निर्मात्यांना भेटायचं आहे. त्यानंतर मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आहे. अर्थात लेझीम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझीम घेतलंही असेल, काय माहिती? इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. मी त्यांना विचारलं की, त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का? की नुसतं सेलिब्रेशनचं गाणं आहे? त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचं गाणं आहे. मग म्हटलं, त्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?”, असं राज ठाकरे म्हणाले.

Budget 2025 : यंदाचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार ?

याविषयी ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहासतज्ज्ञ झाले आहेत, सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतायत सगळ्याबाबतीत. पण म्हटलं जेव्हा लोक चित्रपट पाहायला जाणार तेव्हा औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत, ते डोक्यात ठेवून जेव्हा लोकं जातील आणि ट्रेलरमध्ये लेझीम वगैरे दिसत असेल तर म्हटलं काढून टाका. ज्याने महात्मा गांधी चित्रपट केला. आपल्यासमोर महात्मा गांधींची काही आंदोलनं येतात. पण चित्रपट पाहायला गेल्यावर आपल्याला महात्मा गांधी दांडिया खेळताना दिसले, तर कसं वाटलं असतं? दिग्दर्शकांना तो सीन टाकायचाही असेल, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्याने दांडिया खेळता नाही आला. ते जर दोन काठ्या घेऊन चालले असते, तर कदाचित आला असता सीन. माहित नाही आपल्याला.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -