
मुंबई: दही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात. अशातच आपल्या डाएटमध्ये दह्याचा समावेश जरूर केला पाहिजे. दही हे असे सुपरफूड आहे ज्याचे सेवन तुम्ही थंडी अथवा उन्हाळ्यातही करू शकता. थंडीत दहीचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. तर उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ल्याने शरीरास थंडावा मिळतो. दह्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीरास एनर्जी मिळते.
दही खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण हे खाल्ल्याने इतर काही खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. दही एक प्रोबायोटिक आहे जे कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असते. थंडीत हे खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.
दह्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात जे शरीरास सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात.

मुंबई : आपण दीर्घकाळपर्यंत आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये पोषणाच्या भूमिकेकडे (Health Tips) दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्या जीवनशैली निवडींचा आरोग्यावर ...
दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते जे हाडांसाठी अतिशय फायदेशीर असते. याचे सेवन दररोज केल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यामुळे भूक कमी होण्यास मदत मिळते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते.
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे स्किनसाठी नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. यामुळे स्किन स्मूद, हायड्रेट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.